Thursday, 25 October 2018

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-
# कार्यक्रम पत्रिका:- 
उदा. व्याख्यान
आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी

सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता


सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ 
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे 
इत्यादी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..

@सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली

@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी

@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...

अध्यक्षीय सूचना:-
आजच्या ...कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान आदरणीय एक्स वाय यांनी भूषवावे असे मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो.

अनुमोदन: आताच माझ्या सहकार्याने जी अध्यक्षीय सूचना मांडली त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो.

आभारप्रदर्शन:-
मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे, तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम कधीच सफल होऊ शकला नसता. आपण केलेल्या सूचना आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. आपण केलेल्या सूचनांचा आम्ही लवकरात लवकर कार्यान्वित करू याची आपणास ग्वाही देतो. आपण केलेले मार्गदर्शन आम्हास बहुमुल्य आहे. आपण आपल्या महत्वाच्या कामातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत.थँक यु , धन्यवाद हे शब्द तुमच्या योगदानासमोर खूप छोटे आहेत.मी कुठल्या शब्दात तुमचे धन्यवाद करू, तुमचे योगदान या शब्दांपेक्षा खूप मोठे आहे. धन्यवाद न मानता आपल्या ऋणातच राहणे मला आवडेल.


No comments:

Post a Comment